-
बॉलिवूडच्या 'फर्स्ट लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन यांनी नुकतीच वयाची सत्तरी ओलांडली. या खास दिवसाच्या निमित्ताने बच्चन कुटुंबियांनी एका खास, छोटेखानी पार्टीचं आयोजन केलं होतं. सेलिब्रिटी डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला यांचा या पार्टीत पुढाकार पहायला मिळाला. बच्चन कुटुंबियांसोबतच या पार्टीला करण जोहर, हिरू जोहर, रिमा जैन, सोनम कपूर, सोनाली बेंद्रे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर)
-
यावेळी श्वेता बच्चन नंदा तिच्या आईसोबत म्हणजे जया बच्चन यांच्यासोबतच दिसली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर)
-
अभिषेक बच्चन यानेसही सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. या पार्टीत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / अभिषेक बच्चन)
-
जया बच्चन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकांनी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- फिल्मफेअर)
-
खुद्द बिग बींनीसुद्धा या खास दिवसानिमित्त सोशल मीडियावर सुरेख फोटो पोस्ट केला होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ अमिताभ बच्चन)
-
कलाविश्वात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अनेकांनीच पुन्हा एकदा बी- टाऊच्या 'गुड्डी'ची प्रशंसा करत जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / अभिषेक बच्चन)

India-US Trade Deal: “…तरच करार करू”, अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चांबाबत केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका