-
शब्दांशिवाय सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चॅप्लिनचे सिनेमे. जगातल्या या सर्वात लोकप्रिय इसमाची आज १२९वी जयंती.
-
चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा वसतिगृहांतच गेला. लहानपणी घर असं काही नव्हतंच. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठीही तो स्थानिक कलाकारांच्या मेळय़ांत पडेल ते काम करू लागला.
-
जगाला पोट धरून हसायला भाग पाडणारा चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा. चॅप्लिनचं वास्तव जीवन आणि सिनेमातील चॅप्लिन हे पूर्णपणे वेगळे होते.
-
आपल्या आईसाठी वयाच्या पाचव्या वर्षी त्याने पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं. अचानक तब्येत बिघडल्याने त्याची आई एका कार्यक्रमात परफॉर्म करू शकत नव्हती, तेव्हा ऐनवेळी चार्लीने ती भूमिका साकारली होती.
-
‘मनसोक्त हसवता हसवता प्रेक्षकांना रडायला लावणारा नट’ असे चार्ली चॅप्लिनचे वर्णन केले जाते.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य