-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघांनाही एकत्र पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी जणू एक पर्वणीच. एकेकाळी एकमेकांना डेट करत असल्यामुळे चर्चेत असणाऱ्या या जोडीच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण, त्यांची मैत्री मात्र आजही टिकून आहे. नुकतंच या दोघांनी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी Mijwan Fashion Show 2018 मध्ये रॅम्प वॉक केला आणि सर्वांचच लक्ष वेधलं.
-
यावेळी रॅम्पवर आलेल्या रणबीरचा अंदाज सर्वांची मनं जिंकून गेला.
-
तर नेहमीप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा तिच्या अदांनी सर्वांनाच घायाळ करुन गेली.
-
'तमाशा' या चित्रपटानंतर रणबीर- दीपिका कोणत्याच प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र आले नाहीत. पण, तरीही या फॅशन शोच्या निमित्ताने त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
-
मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या पेहरावामध्ये त्या दोघांचंही सौंदर्य खुलून आलं होतं. त्यामुळे दीपिका आणि रणबीरला एकत्र आणण्याचं श्रेय रणबीरला जातं, असं म्हणायला हरकत नाही.
-
Mijwan Fashion Show 2018 मध्ये रणबीरची आई, नीतू कपूर यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
-
शबाना आझमी.
-
आशा पारेख, वहिदा रहमान.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश