-
'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड का,' असं म्हणत संजूबाबाचा म्हणजेच अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.
-
टीझरमधील रणबीरचं दमदार अभिनय पाहता त्याच्या करिअरची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
संजय दत्तची भूमिकेत साकारण्यासाठी रणबीरने घेतलेली मेहनत टीझरमध्ये सहज पाहायला मिळते.
-
काही चित्रपटांची चुकलेली निवड आणि त्यामुळे रणबीरच्या करिअरला आलेली उतरती कळा पाहता 'संजू' हा चित्रपट त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
-
टीझरमध्ये रणबीरचे पाच वेगवेगळे लूक पाहायला मिळतात. या प्रत्येक लूकदरम्यान तयारीसाठी रणबीरने एक- एक महिन्याचा ब्रेक घेतला होता.
-
रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम