
चौकटीबाहेरच्या विषयांना हाताळत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'न्यूड' या चित्रपटातूनही केला आहे. 
'न्यूड' या नावावरूनच चित्रपट सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'तून डावलला गेलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षक- समीक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 
. प्रपंचाचा गाडा पुढे रेटत असतानाच असा काही प्रसंग समोर उभा ठाकतो की ज्यामुळे शेवटी नशिबाशीच दोन हात करण्याचा निर्णय त्या आईला घ्यावा लागतो. हाच निर्णय तिला मायानगरी मुंबईत आणून सोडतो आणि खऱ्या अर्थाने न्यूडचा प्रवास सुरु होतो. 
न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून रवी जाधवने पुन्हा एकदा अनोख्या कथानकाला मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. -
चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांचं असणंही बरंच महत्त्वाचं ठरुन जातं. एक कलाकार म्हणून असणारी नजर आणि तो बाज त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकून जातो.
-
'अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर'सारख्या बहुचर्चित हॉलिवूडपटाशी झुंज देत 'न्यूड' बॉक्स ऑफीसवर कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिच्या संघर्षाच्या कथेला ‘न्यूड’ या चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा केला गेलेला एक छोटासा प्रयत्न आहे.
MPSC 2025 Exam: एमपीएससी : २८ सप्टेंबरच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर विघ्न; पूर परिस्थितीमुळे परीक्षा…