-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि 'भाने' या ब्रँडचा मालक आनंद अहूजा लग्नाच्या बेडित अडकले असून, त्यांचं लग्न सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत होतं. सोनमच्या मेहंदीपासून ते अगदी तिच्या लग्नातील प्रत्येक क्षणापर्यंतचे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. अनेकांनीच या फोटोंना शेअर करत स्वत:च्या स्टेटसमध्येही त्यांचा समावेश करुन घेतला. अशा या बहुचर्चित आणि थाटामाटात पार पडलेल्या मुख्य लग्न सोहळ्यात सोनम आणि आनंदच्या प्रेमाची सुरेख बाजूही पाहायला मिळाली. सोनमप्रती आनंदच्या मनात असणारा आदर, तिच्याप्रती असणारं प्रेम विवाहसोहळ्यादरम्यान बऱ्याच क्षणांना पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये सोनम ज्यावेळी सर्वांच्या समोर आली तेव्हा तिच्यावरुन अनेकांची नजर हटत नव्हती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
शीख पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
यावेळी लग्नाच्या सर्व विधींमध्ये सोनमच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
बऱ्याचदा तिची खोडकर वृत्तीही पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोनम आणि आनंदमध्ये असणारं प्रेम क्षणाक्षणाला सर्वांचं लक्ष वेधत होतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
यावेळी लग्नानंतर नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोनमने चक्क आनंदला पहिल्यांना 'अहो' म्हणूनही साद दिली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
या लग्न सोहळ्यात फिल्मी टचही पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर सोनम आणि आनंदने केक कापून नव्या प्रवासाला सुरुवात केली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली