-
काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची प्रेयसी अंकिता कोनवार यांचे अलिबागमध्ये अगदी थाटामाटात लग्न झाले. या दोघांच्या रिलेशनशिपपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. मिलिंदनेही त्याचे नाते जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडले. अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले पण तरीही मिलिंद आणि अंकिताने त्यांच्यातील प्रेमातून सर्वांचे तोंड बंद केले. सध्या हे दोघं हवाईमध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. तिकडून त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअरही केले. चला तर मग त्यांनी शेअर केलेले सुंदर फोटो पाहूया…
-
हा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक लोकांनी त्याला बराक ओबामा अशी उपमा द्यायला सुरूवात केली. (फोटो- इन्स्टाग्राम)
-
हा फोटो पाहून सुट्टींच्या दिवसामध्येही मिलिंद आपले डाएट विसरला नाही असेच म्हणावे लागेल. (फोटो- इन्स्टाग्राम)
-
पत्नी अंकिता कोनवारसह मिलिंद सोमण. (फोटो- इन्स्टाग्राम)
-
अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या मिलिंद सोमणने हनिमूनमध्येही आपले वर्कआऊट सोडले नाही. (फोटो- इन्स्टाग्राम)
-
मिलिंदच्या याच डेडिकेशनसाठी त्याच्या अनेक तरुणी आजही फिदा आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल