बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा आज ३६ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडपुरताच प्रियांका मर्यादित न राहता तिनं हॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज प्रियांका ही स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. वाढदिवासनिमित्तानं तिचे न पाहिलेले काही निवडक फोटो. -
प्रियांका मुळची बरेलीची आहे. १८ जुलै १९८२ मध्ये तिचा जन्म झाला. बरेली ते न्यूयॉर्क हा तिचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता.
प्रियांकाचं आर्मी पब्लिक स्कूलमध्ये सुरुवातीचं शिक्षण झालं त्यानंतर अमेरिकेतही तिनं शिक्षण घेतलं. -
प्रियांकाचे वडील आर्मीत डॉक्टर होते. बरेलीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील दोन शाळांमध्ये तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र अमेरिकन शाळेतला अनुभव फारसा चांगला नव्हता तिथे रंगामुळे आपल्याला 'ब्राऊनी' म्हणून चिडवायचे असंही ती म्हणाली.
-
२००० साली प्रियांकानं मिस वर्ल्ड हा किताब पटकावला.
-
लहानपणापासूनं ते आतापर्यंतचे काही निवडक फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीही प्रियांकाचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली