-
चीनमधल्या दताँग येथे पार पडलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय जॅकी चॅन अॅक्शन मूव्ही वीकला 'दंगल गर्ल' फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्राने हजेरी लावली.
-
भारतातील बॉक्स ऑफीसवर दमदार कामिगिरी करणाऱ्या आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाने चीनमध्येही प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली. आमिर खानसोबत फातिमा सना शेख आणि सान्य मल्होत्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'दंगल' या चित्रपटाने चीनमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्यामुळे या दोघींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.
-
सान्या मल्होत्राला सर्वोत्तम नवोदित अॅक्शन स्टारचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
फातिमाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
यावेळी दोघींनी जॅकी चॅनची भेट घेतली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
-
फातिमा सना शेख
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…