
अमिताभ बच्चन- शत्रुघ्न सिन्हा – गेल्या अनेक दशकापासून बॉलिवूडमध्ये राज्य गाजविणाऱ्या या दोन्ही कलाकारांच्या मैत्रीचं कधीकाळी उदाहरण दिलं जात होतं. मात्र ७० च्या दशकामध्ये या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली जी अद्याप कायम आहे. 'काला पत्थर','दोस्ताना' आणि 'शान' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये या दोघांनीही स्क्रिन शेअर केली आहे. 
शाहरुख खान- अजय देवगण राकेश रोशन यांच्या 'करण-अर्जुन' या चित्रपटामुळे या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि अजय या दोघांचीही निवड करण्यात आली होती. मात्र शाहरुखच्या वाट्याला आलेली भूमिका अजयला वठवायची होती. मात्र ही भूमिका अखेर शाहरुखच्याच पदरात पडली त्यामुळे या दोघांमध्ये शत्रूत्व ओढावलं आहे. 
सलमान खान -अनुराग कश्यप सलमान आणि अनुराग कश्यप हे दोघांनी कधीच एकमेकांचा मित्र म्हणून स्वीकार केला नाही. तेरे नाम या चित्रपटापासून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग कश्यपवर होती. तर सलमान मुख्य भूमिकेमध्ये होता. याच दरम्यान दोघांमध्ये एका विशिष्ट कारणामुळे वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. 
कंगना- दीपिका- बॉलिवूडच्या दोन तारका ज्या सध्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कंगना तिच्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असते. तर दीपिका तिच्या सौंदर्यामुळे. मात्र या दोन्ही अभिनेत्रींमध्ये तू तू मैं मैं कायमच सुरु असतं. खरं बघायला गेलं. तर या दोघींमध्ये मैत्री किंवा शत्रू असं कोणतंच नातं नसल्याचं दिसून येतं. कंगनाच्या 'क्वीन' चित्रपटाच्या झालेल्या सक्सेस पार्टीत दीपिका उपस्थित नव्हती आणि तेव्हापासून या दोघी एकमेकींशी बोलणं टाळत असल्याचं समोर आलं आहे. 
दीपिका -कतरिना- या दोघींमधील वाद कोणत्याही चित्रपटावरुन नाहीत. तर चक्क अभिनेता रणबीर कपूरमुळे निर्माण झाले आहेत. दीपिका आणि रणबीर ही जोडी बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. मात्र यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर रणबीरचं सूत कतरिनाबरोबर जुळलं. याच कारणामुळे दीपिका आणि कतरिना आजही एकमेकींशी बोलत नाही. 
विवेक ओबरॉय -सलमान खान – अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरु झाले असून अद्यापही या दोघांमध्ये वाद कायम आहे. ज्यावेळी ऐश्वर्या-सलमानच्या नात्यात दुरावा आला होता. त्यावेळी ऐश्वर्याची विवेकबरोबर जवळीकता वाढत होती. याच कारणामुळे संतापलेल्या सलमानचा राग अनावर होत या दोघांमध्ये वाद झाला.
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…