फॅशन जगतामध्ये महत्वाचा मानल्या जाणाऱ्या 'लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल २०१८'ला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक फॅशन डिझायनर्सने त्यांचे नवीन कलेक्शन सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली आहेत. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा ) या डिझाईन्स सादर करण्यासाठी रॅम्पवर येणारे सेलिब्रिटीसुद्धा या फॅशनवीकच्या केंद्रस्थानी आहेत. सध्या या फॅशन वीकमध्ये अभिनेत्री कंगना रणावतच्या अदांची चर्चा सुरु आहे. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा ) कंगनाने लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी फॅशन डिझायनर पंकज आणि निधी यांच्याबरोबर रॅम्प वॉक केला. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा) यांच्यापूर्वी जान्हवी कपूर, मलायका अरोरा, नेहा धुपिया, अंगद बेदी, बिपाशा बासू यांनीही रॅम्प वॉक केला आहे. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा) अभिनेता वरुण धवननेही त्याच्या स्टायलिश लूकमुळे अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा) या रॅम्प वॉकमध्ये श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनेही तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा) -
पंकज आणि निधी यांनी सादर केलेले नव्या डिझाइन्स उपस्थितांच्या पसंतीत पडत आहेत. (छायाचित्र सौजन्य – दिलीप कागदा)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल