-
श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येत असलेल्या सणासुदीचे वेध सर्वत्र लागू झाले आहेत.
-
गोपाळकाला, गणपती अशा एका मागून एक येत असलेल्या विविध सणवारांदरम्यानचा लोकांमधला उत्साह काही औरच असतो.
-
याच उत्सवांच्या निमित्ताने, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या 'बॉलिवूड थीमपार्क' मध्ये नुकताच दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
-
यावेळी थीम पार्कमध्ये एकच कल्ला आणि हर्ष पाहायला मिळाला होता.
-
कर्जत येथील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडीओत साकारण्यात आलेल्या या बॉलीवूड मायानगरीत, उभारण्यात आलेल्या छोटेखानी हंडीचा स्थानिक गोविंदांनी मनसोक्त आनंद लुटला.
-
त्यासोबतच बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत पार पडलेल्या विघ्नहर्त्याच्या या महाआरतीत एन.डी.स्टुडीओतील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. एरव्ही, बॉलिवूडच्या बहुरंगी जल्लोषाने नटलेले हे थीमपार्क अथर्वशिर्षने अध्यात्मिक रंगात न्हाऊन गेले होते.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा