-
चित्रपटसृष्टी म्हणजे झगमगाट, गॉसिप, मेकअप, एवढंच नव्हे तर इथे सणदेखील तेवढय़ाच उत्साहाने, गांभीर्याने साजरे होतात. राज कपूर यांच्यापासून सुरू झालेला आरके स्टुडिओचा गणेशोत्सव हे याचं ठळक उदाहरण आहे. (छाया- प्रदीप दास)
-
चेंबूर येथील आर. के. स्टडिओ या भव्य वास्तूमधील श्रीगणेशोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होतो. पण आर. के. स्टुडिओतील यंदाचा गणेशोत्सव हा कपूर कुटुंबियांसाठी शेवटचा आहे. (छाया- प्रदीप दास)
-
बॉलिवूडच्या इतिहासात मानाचं स्थान असणाऱ्या या ७० वर्षीय जुन्या स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला आहे. (छाया- प्रदीप दास)
-
चेंबूर येथील आरके स्टु़डिओ दोन एकर जागेवर उभा आहे. जवळपास ७० वर्षांपूर्वी हा स्टुडिओ उभारण्यात आला होता. या स्टुडिओत कपूर कुटुंबीय दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करतात. (छाया- प्रदीप दास)
गणेशोत्सवात कपूर खानदान, आर. के.च्या चित्रपटाचे तंत्रज्ञ व स्टुडिओतील कामगार असे तीनही घटक एकत्र येतात. (छाया- प्रदीप दास) -
गणेशोत्सवात कपूर कुटुंबीय आपलं स्टारपण बाजूला ठेवून आर. के. स्टुडिओच्या गणपती आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात, झांजा वाजवतात, एखादा ठेका पकडतात, गणपती बाप्पा मोरया म्हणतात. (छाया- प्रदीप दास)
-
आता स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याने हे सर्व चित्र यावर्षी अखेरचं दिसणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (छाया- प्रदीप दास)

बापरे! शनी महाराज कर्मांचे हिशोब घेणार! मेषनंतर ‘या’ राशीची साडेसाती सुरु होणार? पुढील अडीच वर्ष दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं येणार?