
बॉलिवूडमधील आरसपानी सौंदर्य म्हणजे अभिनेत्री रेखा. सौंदर्य नेमकं काय असतं हे रेखा यांच्याकडे पाहिल्यावर समजतं. 
रेखा यांनी सौंदर्य आणि उत्तम अभिनय शैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. बॉलिवूडमधील याच सदाबहार व्यक्तीमत्वाचा अर्थात रेखा यांचा आज वाढदिवस. 
रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन असं आहे. 
बॉलिवूडप्रमाणेच त्यांनी तेलगू चित्रपटामध्येही काम केलं आहे. बी रेखा या नावाने त्या आजही तेलगू चित्रपटसृष्टीत ओळखल्या जातात. 
रेखा यांच्या सौंदर्यावर न भाळलेली व्यक्ती दुर्मिळच. 
त्यांनी आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. 
१९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित 'उमराव जान'ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. 
एक काळ असा होता की, रुपेरी पडद्यावरील अमिताभ आणि रेखा यांची जोडी सर्वात हॉट पेअर होती. मात्र काही कारणास्तव या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा