-
'झी मराठी' वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच सर्व प्रेक्षकांच्या लाडक्या 'राणा दा'ने काल महाराष्ट्राचे जेजुरी गडावर हजेरी लावली. जय मल्हार म्हणत हार्दिकने खंडेरायाची मनोभावे पुजा केली. एका दुकानाच्या उद्घाटनानिमित्त तो जेजुरीमध्ये आला होता. त्यावेळी त्याने आवर्जून खंडेरायाचे दर्शन घेतले. हार्दिक जेजरु गडावर पोहचला तेव्हा अनेकांनी त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली. हार्दिकनेही आपल्या चाहत्यांबरोबर आनंदाने फोटो काढून घेतले.
-
हार्दिकने खंडेरायाची मनोभावे पुजा केली
-
खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर हार्दिकने मंदिराबाहेर येऊन भांडाराही उधळला
-
एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आलेल्या हार्दिकने आवर्जून खंडेरायाचे दर्शन घेतले
-
गडावरील विशेष आकर्षण असलेली प्रसिद्ध खंडा तलवारही 'राणा दा'ने अगदी सहज उचलून घेतली
-
गडावरील या खंडा तलावरीचे वजन ४२ किलो आहे
-
तो बराच वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात थांबला होता
-
'राणा दा'ने खंडेरायाकडे काय मागितले असेल बरं?

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग