बॉलिवूडची देसी गर्ल लवकरच अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नापूर्वी तिच्या ब्राइडल शॉवरचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. प्रियांकाच्या जवळच्या मैत्रिणी मुबिना आणि अंजुला यांनी या पार्टीचे न्युयॉर्कमध्ये आयोजन केलं होतं. प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा स्ट्रेपलेस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत ५९९५ डॉलर रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे. -
प्रियांका चोप्रा
या ड्रेसमध्ये प्रियांका सिंपल आणि स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहे. या पार्टीमध्ये प्रियांकाचे हॉलिवूडमधील अनेक मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. प्रियांका १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये निक जोनाससोबत लग्न करणार आहे.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल