-
मुंबई म्हणजे बॉलिवूडचे माहेरघऱ. मनोरंजन श्रेत्रातील अनेक बड्या व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आवर्जून त्यांच्या निवसस्थानासमोर चाहत्यांची गर्दी होते. यावेळी या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या तुकड्यांना नियुक्त केले जाते. असंच काहीसं काल रात्री वांद्र्यात झालं. कारण काल रात्रीपासूनच वांद्रातील मन्नत बंगल्यासमोर शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांची गर्दी जमू लागली. पण या चाहत्यांनी मुबंई पोलिसांना केक वाटून शाहरुखचा वाढदिवस साजरा केल्याने सोशल मिडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
शाहरुखच्या चाहत्यांनी शाहरुखच्या दर्शनानंतर तिथेच मन्नत समोर केक कटिंग केले. अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीने केक बनवून आणले होते. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त कापलेला केक मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या मुंबई पोलिसांबरोबर शेअर करुन आपल्या लाडक्या अभिनेत्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
-
हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
यामध्ये अगदी पोलिसांच्या गाड्यांमध्ये असलेल्या अधिकारी आणि शिपायांनाही केकचे वाटप केले.
-
शाहरुखने वाढदिवसचा रात्री १२ चा ठोका पडल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या चाहत्यांना दर्शन दिले. शाहरुखने चाहत्यांना अभिवादन केले. अनेकांनी त्याची एक झकल आपल्या मोबाईल तसेच कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी धावपळ सुरु केली. या सर्वानंतर शाहरुख परत घरात गेला. चाहत्यांची गर्दी मात्र रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवरच होती आणि त्याचबरोबर होते या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गर्दीतील लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले मुंबई पोलीस.
-
दर वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच संध्याकाळी अनेकांची पावले वांद्र्यातील मन्नत बंगल्याकडे वळू लागतात. कारण त्यांच्या सर्वात आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस असतो. हो हे चित्र दरवर्षीचे आहे कारण २ तारखेला 'बॉलिवूडचा किंग खान' शाहरुख खानचा वाढदिवस असतो. यंदाही शाहरुखच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या आदल्या दिवसापासूनच त्याच्या घराबाहेर गर्दी करायला सुरुवात केली.
-
शाहरुखनेही आपण पत्नीला वाढदिवसाचा केक भरवून वाढदिवस साजरा केल्याची माहिती चाहत्यांना ट्विटवर दिली.

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया