एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटातून अनेकांच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस. बाहुबलीमधील तिची देवसेना ही भूमिका प्रचंड गाजली होती. तिच्या या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ७ नोव्हेंबर १९८१ रोजी जन्मलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी. अनुष्का एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक दिलदार व्यक्ती म्हणून देखील ओळखली जाते. काही वर्षापूर्वी तिच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरला त्याचा प्रामाणिकपणा पाहून तिने चक्क १२ लाखांची नवी गाडी भेट म्हणून दिली होती. रुपेरी दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का योग प्रशिक्षक होती. भरत ठाकूर यांच्या साह्याने ती योग प्रशिक्षणाचे काम पाहत होती. त्याचदरम्यान एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर खिळली आणि त्याने तिला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दिली. ‘पुरी जगन्नाथ’, ‘महा नंदी’, ‘विक्रमर्कुडू’, ‘अस्त्रम’, ‘रेनुडू’, ‘स्टॅनलिन’, ‘साईज झिरो’ यासारख्या अनेक तेलगू चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री तब्बल १४० कोटींची मालकीण आहे. -
राजामौलींचा वरदहस्त असलेली अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी २.३ कोटींचं मानधन घेते.
आलिशान आणि महागड्या गाड्यांची आवड असणाऱ्या अनुष्काकडे बीएमडब्ल्यू ६, ऑडी ए६, ऑडी क्यू५ आणि टोयोटा कोरोला या गाड्या आहेत. -

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”