
‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकलेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी बुधवारी लग्नगाठ बांधली. 
डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देणाऱ्या या जोडीने इटलीमधील लेक कोमा येथील एका आलिशान व्हिलामध्ये सिंधी आणि कोंकणी पद्धतीने लग्न केलं. 
पारंपारिक पद्धतीने लग्न करणाऱ्या या जोडीने लग्नातील सारे रितीरिवाज पार पडले. यावेळी नंदीपूजा, मेहंदी, संगीत, हळद या सारखे कार्यक्रमदेखील पार पडले. 
रणवीरच्या घरी हळदीच्या कार्यक्रमाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. या हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो कास्टिंग डायरेक्टर शोना शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. 
या लग्नसोहळ्याला दीप-वीरच्या केवळ जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. मुंबईत परतल्यावर तेबॉलिवूडमधील सेलिब्रेटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत.
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा