-
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची मुख्य भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकार आणि राजकीय धुरंदर उपस्थित होते. (फोटो: अमित चक्रवर्ती, एक्सप्रेस फोटोग्राफर)
-
मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला.
-
महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
अमृता राव हिने मिनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे
-
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.
-
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम