दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्याने आज (सोमवारी) व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी यांच्याशी लग्नगाठ बांधली. सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका असून विशगनही चेन्नईस्थित व्यावसायिक आहे. चेन्नईतील 'द लीला पॅलेस'मध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. सौंदर्याचं हे दुसरं लग्न असून तिने २०१० मध्ये व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र काही कारणास्तव तिने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. सौंदर्याप्रमाणेच विशगनही घटस्फोटीत आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत विशगन याचे पहिले लग्न झाले होते.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग