-
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. तेजस्विनी गेली दोन वर्षं नवरात्रोत्वात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत आहे. पाहुयात 'तेजस्विनी' नवदुर्गेची रुपं…
-
ऑगस्ट महिन्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरून तेजस्विनीचं हे 'अंबाबाई'चं रुप.
-
कामाख्या- प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती योनीमधून होते आणि म्हणूनच 'कामाख्या'च्या रूपात योनीची पूजा होते.
-
जरीमरी आई- जलप्रदूषणाचा महत्त्वाचा मुद्दा तेजस्विनीने या रुपातून मांडला.
-
भ्रष्ट्राचार व काळ्या धनाचा प्रश्न मांडणारे हे महालक्ष्मीचे रुप
-
वाघांच्या शिकारीचा प्रश्न मांडणारे शेरावाली मातेचं रुप
-
महाराष्ट्रातील पूर व दुष्काळ या दोन्ही परिस्थितींचं भीषण वास्तव दर्शवणारे तुळजाभवानीचे रुप
-
मुंबईच्या दुर्दशेचं चित्र दाखवणारे हे मुंबादेवीचं रुप
-
'आरे'तील वृक्षांच्या कत्तलीवरील हे मार्मिक चित्रण- गावदेवी
-
पृथ्वी माता
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा