-
२००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'दे धक्का' चित्रपट मराठी चित्रपसृष्टीमधील हीट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात मकरंद अनाजपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांनी बाल कलाकरांची भूमिका साकारली होती. पण हिच लहानपणीची गौरी आता कशी दिसते हे माहित आहे का? चला पाहुया…
-
'दे धक्का' चित्रपटात गौरीने सायली ही भूमिका साकारली होती.
-
गौरीचे चित्रपटातील 'उगवली शुक्राची चांदणी' हे गाणे भलतेच गाजले होते. या गाण्याने गौरीला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
-
दे धक्का चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलेली सायली उर्फ गौरी आता २४ वर्षांची आहे.
-
ती सध्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
-
शिक्षणामुळे गौरी काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मात्र ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा