
मनिषा कोइराला – मनिषा कोइराला – ९० चा काळ गाजविणारी अभिनेत्री मनिषा कोइराला हिच्या लूकमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. 'सौदागर', 'बॉम्बे', 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मनिषा आता ४९ वर्षांची असून तिच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाल्याचं दिसून येतं. 
रेवती – बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे रेवती. 'लव', 'फिर मिलेंगे', '२ स्टेट्स', 'रात','निशब्द' या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये रेवतीने काम केलं आहे. 
पूजा भट्ट – ९० च्या दशकातील सुंदर आणि मोस्ट स्टायलिश अभिनेत्री म्हणून पूजा भट्टकडे पाहिलं जात होतं. त्या काळी पूजा केसांची स्टाइल तरुणींमध्ये प्रचंड फेमस होती. आज पूजा ४७ वर्षांची झाली आहे. 
अमृता सिंग- एकेकाळी अमृता सिंगच्या सौंदर्याच्या अफाट चर्चा रंगायच्या. वयोमानानुसार आता अमृतामध्ये प्रचंड बदल झाला आहे. वयाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. 
तब्बू – बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण करणारी तब्बू आता वयस्कर झाल्यासारखी दिसू लागली आहे. त्यामुळे तिचा कलाविश्वातील वावरही कमी झाला आहे.
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा