
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या सुपरहिट ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील ‘लारा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री एवलीन शर्माने नुकताच साखरपुडा केला आहे. 
एवलीनने तुषान भिंडीसोबत साखरपुडा केला असून सध्या त्यांचे रोमॅण्टिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बर ब्रिजवर प्रियकर तुषान भिंडीने एवलीनला प्रपोज केलं. त्यानंतर एवलीनने तुषानला लगेच होकार दिला. 
तुषान हा ऑस्ट्रेलियात दंतचिकित्सक आहे. 
एवलीनने ‘साहो’, ‘नौटंकी साला’, ‘ये जवानी है दिवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे.
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा