
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामधील सहभागी आस्ताद काळेने या घरामध्ये त्याची लव्हस्टोरी सर्वांसमोर सांगितली होती. 
गेल्या काही वर्षांपासून आस्ताद काळे मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. 
हे दोघं अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. 
काही दिवसांपूर्वीच आस्ताद, स्वप्नालीने एकमेकांसोबतचे काही रोमँण्टिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. 
आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा