
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. 
रोखठोक बोलण्यासोबतच सौंदर्यामुळे शिवानी कायमच चर्चेत असते. 
आपलं मत स्पष्टपणे मांडणारी शिवानी तिच्या ड्रेसिंग सेन्सकडे विशेष लक्ष देत असते. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. 
शिवानीने नुकतंच एक फोटोशूट केलं असून यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या लूकमुळे तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. 
या फोटोमध्ये तिने मरुन रंगाचा लाँग स्कर्ट परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. सोबतच त्याला साजेसा मेकअपही केला आहे. 
पडद्यावर आदर्श पण कणखर सुनेची भूमिका साकारणारी शिवानी खऱ्या आयुष्यात अत्यंत बेधडक आणि रोखठोक बोलणारी आहे. 
छोट्या पडद्यावरील 'देवायानी' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. -
-
-
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी