-
६० आणि ७० च्या दशकात कॅब्रे नृत्यप्रकारास प्रसिद्धीस आणणा-या अभिनेत्री हेलन यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३८ साली एंग्लो-इंडियन वडिल आणि बरमीज आईच्या पोटी रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जॉर्ज डेसमायर होते. त्यांच्या करियरमध्ये त्यांनी ७०० चित्रपटांमध्ये काम केले.
-
दुस-या महायुद्धात हेलन यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावे लागले. यामुळे त्यांनी त्यांचा देश सोडून भारतात राहण्याचे ठरविले. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी शाळा सोडावी लागली होती. हावडा ब्रिजमधून त्यांना वयाच्या १९व्या वर्षी पहिला ब्रेक मिळाला होता.
-
त्या काळी अभिनेत्री अंगभर कपडे परिधान करायच्या. पण त्याचवेळी हेलन यांनी कमी कपडे परिधान करून कॅब्रेच्या जोरावर प्रसिद्धी मिळविली.
-
भारतीय चित्रपटांमध्ये बॅली नृत्य प्रकारास ओळख मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर बॉलीवूड चित्रपटांमध्ये ट्रेण्ड झालेला हा नृत्यप्रकार आजही कायम आहे.
-
हेलन आणि ५०च्या दशकातील अभिनेत्री मधुमती यांचा चेहरा मिळताजुळता आहे. त्यामुळे अनेकदा या दोघींमध्ये गल्लत केली जायची.
-
हेलन यांनी १९५७ साली चित्रपट दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्याशी लग्न केले होते. पण, हे लग्न काही टीकू शकले नाही. अरोरा हे हेलन यांना न सांगता त्यांची कमाई खर्च करायचे. याला कंटाळून हेलन यांनी घटस्फोट दिला. आपल्या वैवाहिक जीवनादरम्यान त्या दिवाळखोर झाल्या होत्या आणि त्यांचे अपार्टमेन्टही जप्त करण्यात आले होते.
-
१९६२ साली काबली खान यांच्या सेटवर हेलन यांची ओळख सलीम खान यांच्याशी झाली. या चित्रपटात त्या मुख्य भूमिका साकारत होत्या. तर सलीम हे नकारात्मक भूमिकेत होते.
-
१९८१ साली हेलन आणि सलीम यांनी विवाह केला. त्या सलीम यांच्या दुस-या पत्नी आहेत.
कामातील प्रयत्न यशस्वी तर प्रिय व्यक्तीची होईल भेट; तुमच्यावर कशी राहील स्वामींची कृपा? वाचा राशिभविष्य