-
आपल्यापैकी अनेकांचा आवडता टाइमपास म्हणजे मोबाईलवर युट्यूबवरील व्हिडिओ बघणे. आज युट्यूब न पहिल्याशिवाय दिवस बाजूला सारणारा क्वचितच एखादा स्मार्टफोन युझर सापडेल. खरोखरच आपल्यापैकी अनेजण हे तासन् तास युट्यूबवरचे व्हिडिओ पाहण्यात घालवतात. मग ते व्हिडिओ काही फॅक्टचे असो, चित्रपटांसंदर्भात असो किंवा प्रॅक असो आपल्या पैकी सर्वचजण असे व्हिडिओ पाहतात.
-
पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही आता युट्यूबवर कंटेट तयार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातही भारतीय महिला आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. एका अंदाजानुसार भारतामध्ये १२० हून अधिक महिला युट्यूब कंटेट जनरेटर म्हणजेच युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्लॉगर्स आहेत. या महिला अगदी मनोरंजनापासून स्वयंपाक आणि सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंतच्या विषयांवरील व्हिडिओ बनवतात. चला तर मग जाणून घेऊयात भारतामधील अव्वल दहा महिला युट्यूबर्सबद्दल…
-
सोनाली भदौरिया- सोनाली ही एक डान्सर आहे. तिच्या चॅनेलचे नाव लिव्ह टू डान्स विथ सोनाली असं आहे. तिच्या चॅनेलला १७ लाख फॉलोअर्स आहेत.
-
श्रुती अर्जून आनंद – श्रुती ही एक फॅशन ब्लॉगर आहे. नऊ वर्षापुर्वी श्रुतीने युट्यूब चॅनेल सुरु केले. ती आपल्या व्हिडिओमधून मजेदारपद्धतीने फॅशन टीप्स देत असते. तिच्या चॅनेलला ३९ लाख फॉलोअर्स आहेत.
-
शर्ली सेठीया – शर्ली ही एक गायिका आहे. सोशल मिडियावरुन लोकप्रिय झालेल्या शर्लीने शाबीर खानने दिग्दर्शित केलेल्या निकम्मा चित्रपटामध्ये गाणंही गायलं आहे. तिच्या चॅनेलला ३ लाख फॉलोअर्स आहेत.
-
निशा मधुलिका – निशा या पेशाने शेफ आहेत. त्या अनेक वेबसाईटसाठी फूड कॉलम लिहितात. स्वत:च्या नावाने चालवत असलेल्या निशा यांच्या चॅनेलला ७१ लाख फॉलोअर्स आहेत.
-
त्रिशा – त्रिशाही एक ब्युटिशियन आहे. ती आपल्या इंडियन गर्ल चॅनेल त्रिशा या चॅनेलच्या माध्यमातून मुलींना सौंदर्यासंदर्भातील टीप्स देत असते. अवघ्या तीन वर्षांमध्ये तिच्या फॉलोअर्सची संख्या २३ लाखांपर्यंत पोहचली आहे.
-
विद्या अय्यर – विद्या ही एक उत्तम गायिका आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचे फ्युजन करत ती भन्नाट व्हिडिओ आपल्या विद्या व्होक्स या चॅनेलवर अपलोड करते. तिचे एकूण ५९ लाख फॉलोअर्स आहेत.
-
अनिशा दिक्षित – अनिशाच्या युट्यूब चॅनेलचे नाव अगदी हटके आहे. रिक्षावाली या नावाने चॅनेल चालवणारी अनिशा २०१३ साली या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा आली. तिचे एकूण २० लाख फॉलोअर्स आहेत. अनिशा मनोरंजनासंदर्भातील वेगवेगळ्या थीमवर आधारित व्हिडिओ बनवते.
-
कबिता सिंग – कबिता ही एक शेफ आहे. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरुन झटपट एखादा भन्नाट पदार्थ कसा बनवता येईल यासंदर्भातील व्हिडिओ कबिता बनवते. तिच्या चॅनेलचे नाव कबिताज किचन असं आहे. तिच्या युट्यूब चॅनेलच्या एकूण फॉलोअर्सची संख्या ५० लाख इतकी आहे.
-
प्राजक्ता कोळी – मुंबईची पोरगी असणारी प्राजक्ता हे या यादीमधील एकमेव मराठी नाव. अर्थात तिचे व्हिडिओ आणि चॅनेल हे हिंग्लीश म्हणजेच हिंदी आणि इंग्रजीमधून आहे, मात्र त्याला मुंबईकर टच आहे. प्राजक्ता ही आपल्या मोस्टली सेन या चॅनेलवर अनेक मजेदार व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे एकूण ३९ लाख फॉलोअर्स आहेत.
-
पुजा लुथरा – पुजा आपल्या व्हिडिओमधून घरगुती औषधे आणि त्वचेसंदर्भातील काळजी घेण्याचे सल्ले देते. तिच्या चॅनेलला ३८ लाख फॉलोअर्स आहेत.
Govinda: अभिनेता गोविंदाला झालेला सिंकोपी विकार नेमका काय आहे? तुम्हालाही जाणवताहेत का ही लक्षणे?