-
तुला पाहते रे मालिकेतून सुबोध भावे आणि गायत्री दातार मराठी प्रेक्षकांच्या घरात पोहोचले. यासोबत मालिकेत इतर कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत ओळख मिळवली. यामील एक नाव म्हणजे पूर्णिमा डे.
-
पूर्णिमाने तुला पाहते रे मालिकेत जयदीप सरंजामे याच्या पत्नीची भूमिका निभावली होती.
-
तिची ही भूमिका अनेक प्रेक्षकांना आवडली होती.
-
इतर मराठी कलाकारांप्रमाणे पूर्णिमादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
आपले अनेक फोटो पूर्णिमा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
पूर्णिमाने नुकतंच हिवाळ्याच्या निमित्ताने फोटोशूट केले असून इन्स्टाग्रावर हे फोटो शेअर केले आहेत.
-
तिचे हे ग्लॅमरस फोटो पाहून ओळखणंही कठीण जाईल.
-
पूर्णिमाने याआधीही मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
यासोबत तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक