अभिनेता हृतिक रोशन व सुझान खानने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. विभक्त झाले तरीही हृतिक आणि सुझान यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे. रेहान आणि रिधान या आपल्या दोन मुलांसाठी ते नेहमीच एकत्र येतात. कुटुंबाला सर्वाधिक महत्त्व देणारे हे दोघं सध्या रोशन कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या फॅमिली ट्रिपच्या फोटोंमध्ये रोशन कुटुंबातील तीनही पिढ्या पाहायला मिळत आहेत. सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रेहान आणि रिधानसोबत हृतिक, राकेश रोशन, पिंकी रोशन, सुनैना रोशन, राजेश रोशन, पश्मिना रोशन पाहायला मिळत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुझानने 'मॉडर्न फॅमिली' असं म्हटलंय. नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून संपूर्ण रोशन कुटुंबाने ही ट्रीप काढली आहे. -
या फॅमिली ट्रिपच्या निमित्ताने ह्रतिक आणि सुझान हे दोघे चांगले मित्र आहेत, हे पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ सुझान खान

Indore Couple : शिलाँगला मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशीची हत्याच; शवविच्छेदन अहवालात काय?