माझे आणि पॉलाचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरही घट्ट नाते असल्याचे सारंग सांगतो. ‘टोरोंटो फिल्म फेस्टिव्हल’ला एका पार्टीमध्ये सारंग पॉलाला भेटला होता. नंतर सारंग आणि अनुषा एका कार्यक्रम करत असताना कॅनडाहून एक मुलगी येणार असल्याचे समजले. तिला भेटल्यावर कुठेतरी आधी पाहिल्याचे सारंगला आठवत होते. पॉलाला मात्र टोरोंटोला भेटल्याचे नीट आठवत होते. सारंग आणि पॉलाच्या बोलण्याची सुरुवातच मजेदार झाली. मित्रांनी त्याला कॅनडाहून सारंगची फॅन आली आहे, अशी चिडवाचिडवी सुरू केली. तिला मराठी समजत नसल्याने सारंगला पॉलाशी संवाद साधण्यास अडचण व्हायची. दोन दिवस बोलत नाही म्हटल्यावर तिने सारंगची मस्करी केली. पहिल्याच भेटीत सारंगला ती आवडली होती. तिच्याशी बोलताना मराठीतून फ्लर्ट केलेलं अजून मला आठवतं, असं सारंग सांगतो. तिचे विचार, स्वभाव, काम करण्याची पद्धत हळूहळू सारंगला आवडायला लागली. एकाच महिन्यात सारंग आणि पॉलाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे दोघे आणि अनुषा पुण्यात घर घेऊन राहायला लागले. याआधी घरी आई वडिलांना सारंगने त्याच्या नात्याविषयी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून हे एकत्र राहत आहेत. घरातील सगळ्या गोष्टी, कामे, घरखर्च ते विभागून घेतात. पॉला वयाच्या अठराव्या वर्षी जपानला फिरून आली आहे. ती कुठल्याही संस्कृतीत लवकर मिसळून जाते. कॅनडामध्ये सरकार चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य करते. भारतातील चित्रपट निर्मिती, विविधता या गोष्टींमुळे पॉला भारतात आली. भाडिपा (भारतीय डिजीटल पार्टी) हे तिचे बाळ आहे. कारण हे सुरू करण्याची संकल्पना तिची होती. आज भाडिपाला चार वर्षे झाली असून पॉला आणि सारंगचे नाते सहा वर्षांचे झाले आहे.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…