-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्रही तितकेच प्रसिद्ध आहे.
-
या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे.
-
सोनालिका जोशीचा जन्म पाच जून १९७६ रोजी एका मराठी कुटुंबात झाला.
-
सोनालिकाने इतिहास हा विषय घेऊन बीएमध्ये पदवी मिळवली आहे.
-
सोनालिकाने फॅशन डिझायनिंग आणि थिएटरचेही शिक्षण घेतले आहे.
-
सोनालिका यांचा समीर देशमुख यांच्याबरोबर विवाह झाला आहे.
-
या जोडप्याला आर्या नावाची एक मुलगी आहे.
-
सोनालिका सध्या मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतात.
-
करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोनालिका जोशी यांनी नाटकांमध्ये अभिनय केला आहे.
-
सोनालिकाने काही मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
२००८ साली सोनालिका जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत माधवी भिडे ही भूमिका मिळाली.
-
सोनालिका जोशी यांनी माधवी भिडे ही मध्यमवर्गीय मराठी गृहिणीची भूमिका पूर्ण ताकदीने साकारली आहे.
-
सोनालिका जोशी यांच्याशिवाय माधवी भिडेच्या भूमिकेत प्रेक्षक दुसऱ्या कोणाचा विचारच करु शकत नाहीत. ही त्यांच्या अभिनयाची ताकद आहे.
-
आत्माराम भिडे या शिक्षकाच्या पत्नीची भूमिका साकारताना सोनालिका लोणच, पापड असे घरगुती खाद्यपदार्थ बनवून कुटुंबाला आर्थिक हातभारही लावतात.
-
माधवी भिडे या भूमिकेला विनोदी आणि संवेदनशील अशी दोन अंग आहेत. त्यामुळे ही भूमिका साकारणे तितके सोपे नव्हते. पण सोनालिकाने हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”