'मैने प्यार किया' या चित्रपटातून खऱ्या अर्थाने नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणार सलमान आजही कलाविश्वात सक्रीय आहे. १९८८ पासून ते आजपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने नावलौकिक मिळविण्यासोबतच अमाप संपत्तीही जमवली. सलमानला सायकल चालविण्याचं प्रचंड वेड आहे. अनेकदा तो मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसतो. त्याच्याकडे GiantPropel2014XTC ही सायकलही आहे. विशेष म्हणजे या सायकलची किंमत जवळपास ४ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) सायकलप्रमाणेच सलमानकडे काही बाईक्सही ( दुचाकी) आहेत. यामध्ये त्याच्याकडे १६ लाखांची हायाबूसा, यामहा R1 (१५ लाख रुपये), सुझुकी GSX-R1000Z(१६ लाख) आणि सुझुकी इंट्रूयूडर M1800RZ (१६ लाख) या बाईक्सचा समावेश आहे. ( सौजन्य : सोशल मीडिया) सलमानला गाड्याची विशेष आवड आहे. त्याच्याकडे कारचं मोठं कलेक्शन असून प्रत्येक गाडी प्रचंड महाग असल्याचं सांगण्यात येतं. सलमानकडे सध्या Mercedes Benz GL Class (जवळपास ८० लाख), Mercedes Benz S Class (जवळपास ८२ लाख), Audi A8 L (जवळपास १.१३ कोटी), BMW X6 (जवळपास १.१५ कोटी) Toyota Land Cruiser (जवळपास १.२९ कोटी), Audi RS7 (जवळपास १.४ कोटी) Range Rover (जवळपास २.०६ कोटी), Audi R8 (जवळपास २.३१ कोटी) a Lexus LX470 (जवळपास २.३२ कोटी) या गाड्या आहेत. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) सलमानकडे जवळपास ३ कोटी रुपयांचं प्रायव्हेट यॉट असल्याचं म्हटलं जातं. ( सौजन्य : सोशल मीडिया) कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी प्रायव्हसी मिळत नसल्यामुळे सलमानने मुंबईमध्ये एक 5BHK बीच साइड घर विकत घेतलं आहे. १०० एकर परिसरात असलेल्या या घरात बऱ्याच सुखसुविधा आहेत. या घराची किंमत जवळपास १०० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. सलमानने पनवेल, गोराई, मुंबई या ठिकाणी घरं खरेदी केली असूनही आजही तो मुंबईतील गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या घरात त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब राहतं. गॅलॅक्सी अपार्टमेंटप्रमाणेच त्याने मुंबईतील एका ११ मजली इमारतीत गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कदाचित लवकरच सलमान आणि त्याची फॅमिली या घरात शिफ्ट होईल असं सांगण्यात येत आहे. सलमानचा पनवेलमधील फार्महाऊस साऱ्यांनाच ठावूक असेल. सलमान बऱ्याच वेळा या फार्महाऊसवर पार्टी करत असतो. हा फार्महाऊस १५० एकर जागेत असून त्याची किंमत ८० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) सलमानचं गोराईमध्ये देखील एक फार्मफाऊस आहे. (सौजन्य : सोशल मीडिया) सलमानचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस असून त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'बींइग ह्युमन' हा सलमानचा स्वत:चा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डमधून त्याची वार्षिक कमाई २३५ कोटी रुपये होते. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!