अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अनुष्काने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'सुलतान', 'एनएच १०', 'पीके', 'संजू' यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनय कौशल्याचं कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट चांगलेच गाजले. 'रिपब्लिक वर्ल्ड' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने २०१९ या वर्षात २८.६७ कोटी रुपयांची कमाई केली. २०१९ च्या 'फोर्ब्स' मासिकाच्या टॉप १०० सेलिब्रिटींच्या यादीत ती २१व्या स्थानावर होती. अनुष्काची एकूण संपत्ती तब्बल ३५० कोटी इतकी आहे. अनुष्का दरवर्षी ठराविक रक्कम दान करते. एका चित्रपटासाठी ती जवळपास १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेते. अभिनयासोबतच तिने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलंय. 'क्लिन स्लेट फिल्म' असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. निर्मिती कंपनीसोबतच अनुष्काचा स्वत:चा फॅशन ब्रँडसुद्धा आहे. 'नुश' असं या फॅशन ब्रँडचं नाव आहे. मिंत्रा, निविया, एल १८, पँटीन, लावी अशा मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा ती करते. अंधेरी येथे अनुष्काचा आलिशान फ्लॅट असून लोखंडवाला आणि वर्सोव्यातील ट्रिप्लेक्स येथे तिचे दोन ऑफिस आहेत.

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव