टेलिव्हिजनवर अनेक वर्षांपासून सुरू असणारी लोकप्रिय मालिका कोणती असे कोणालाही विचारल्यास ‘सीआयडी’ हे नाव नक्कीच ऐकायला मिळणार. सरकार बदललं, मुलं लहानाची मोठी झाली तरी गेल्या २२ वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्त मालिकेच्या कलाकारांना किती मानधन मिळायचे ते जाणून घेऊयात… मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे ‘एसीपी प्रद्युम्न सिंह’. अभिनेते शिवाजी साटम गेली २२ वर्षे ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका साकारत आहेत. ‘देसी मार्टिनी’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिवाजी साटम एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये इतके मानधन घ्यायचे. विशेष म्हणजे साटम ‘सीआयडी’ मालिकेसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करायचे. मालिकेत ‘सिनीअर इन्स्पेक्टर अभिजीत’ची भूमिका साकारणारा आदित्य श्रीवास्तव एका एपिसोडसाठी ८० हजार ते १ लाख रुपये मानधन घ्यायचा. कुठलाही दरवाजा तोडण्यासाठी नेहमीच सज्ज असणारा मालिकेतील ‘इन्स्पेक्टर दया’ एका एपिसोडसाठी १ लाख रुपये घ्यायचा. २०१२ पासून या मालिकेत ‘श्रेया’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवी छेडा एका एपिसोडसाठी ४५ हजार रुपये घ्यायची. मालिकेला विनोदी तडका देणारी भूमिका ‘फ्रेड्रिक्स’ची आहे. ही भूमिका साकारणारा दिनेश फडणीस एका एपिसोडसाठी ७० ते ८० हजार रुपये घेत होता. ‘पूर्वी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्शा सय्यद एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये घेत होती. मालिकेत फॉरेन्सिक लॅबमध्ये ‘डॉक्टर साळुंखे’सोबत काम करणारी ‘डॉ. तारिका’ म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा मुसळे एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये घेत होती. सब इन्स्पेक्टर ‘ताशा’ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री वैष्णवी धनराज एक एपिसोडसाठी ५० हजार रुपये घ्यायची.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली