-
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यात सर्व चित्रपट मालिकांचं शूटींगही बंद आहे. अशा परिस्थितीत काही जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. (सर्व फोटो : यूट्यूब)
-
दूरदर्शनवरही अनेक जुन्या मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वांचं आवडत एक कार्टून म्हणजे जंगल बुक. आज आपण जाणून घेऊ जंगल बुकच्या काही माहित नसलेल्या किस्स्यांबद्दल.
-
रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म १८६५ मध्ये भारतात झाला. १९९४ मध्ये त्यांचं शॉर्ट स्टोरी द जंगल बुक प्रकाशित झालं होतं.
-
या गोष्टींमध्ये किपलिंग यांनी काही चित्रही रेखाटली होती.
-
या गोष्टींवर १९६७ मध्ये वॉल्ट डिस्नेनं पहिला चित्रपट तयार केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
डिस्नेच्या चित्रपटानंतर द जंगल बुक मधील अनेक पात्रांचं नाव चुकीच्या पद्धतीनं उच्चारलं जात असल्याचं समोर आलं आहे.
-
या कार्टूनमधील महत्त्वाचं पात्र मोगली याचं खरं नाव मोगली असं नसून किपलिंग यांच्या मते माउगली होते.
-
तर यात दाखवण्यात आलेल्या अजगराचं नाव कार आणि बल्लूचं नाव बरलू असं होतं.
-
२०१६ मध्येही नव्या रूपात जंगल बुक हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट आपल्या व्हिज्युअल इफेक्टसाठी प्रामुख्यानं ओळखला गेला.
-
या चित्रपटात नील सेठीनं मोगलीचं पात्र साकारलं होतं. तर काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवरही मोगली: लेजेंड ऑफ दि जंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
भारतात जंगल बुकचा जपानी शो हिंदीमध्ये डब करून दाखवण्यात आला होता.
-
भारतात ही सिरिज दूरदर्शनवर प्रदर्शित झाली होती.
-
वॉल्ड डिस्नेच्या १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात जंगल बुकच्या एका गाण्यासाठी जगातील सर्वात लोकप्रिय बँड द बिटल्सला अप्रोच करण्यात आलं होतं.
-
परंतु बिटल्सनं गाणं तयार करण्यास नकार दिला होता.
-
बिटल्सचे बँड मेंबर जॉन लेनन यांनी आपल्याला कोणतीही अॅनिमेटेड चित्रपट करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
-
परंतु काही वर्षांनी त्यांनी सबमरिन नाव्याच्या एका अॅनिमेटेड चित्रपटासाठी काम केलं होतं.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…