१९९५ ते १९९९ या काळात छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेली 'हम पाँच' ही मालिका तुफान गाजली. मालिकेची स्क्रीप्ट, त्यातील विनोद, दमदार कलाकार आणि एकापेक्षा एक भन्नाट भूमिका हे मालिकेच्या यशामागचं खरं कारण आहे. लॉकडाउनमध्ये ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. मालिकेत स्वीटी माथूरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजन तुम्हाला माहितीच असेल. राखीने मालिकेसंदर्भातील काही खास आठवणी सांगितल्या आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितलं की तिचे वडील तिच्या मालिकेत काम करण्याच्या निर्णयाविरोधात होते. "जवळपास १०-२० वर्षांनी मी ही मालिका पुन्हा पाहतेय. माझ्यासाठी ते क्षण फार खास होते. मात्र माझे वडील माझ्यावर नाराज होते. त्या रागात त्यांनी मालिका कधीच पाहिली नाही. इतकंच नव्हे तर मालिकेची एक फ्रेमसुद्धा बघण्यास त्यांनी नकार दिला होता", असं तिने सांगितलं. त्यावेळी मुलींनी अभिनय करणं, मॉडेलिंग करणं हे अनेकांना अमान्य होतं. मात्र लॉकडाउनमुळे आता राखी तिच्या बाबांसोबत बसून ती मालिका पाहते. "माझे वडील आता माझी मालिका पाहत आहेत, त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट फार समाधानकारक आहे", असं ती म्हणाली. मालिका गाजल्यानंतर, लोकांनी राखीच्या अभिनयाची स्तुती केल्यानंतर तिच्या वडिलांनी अभिनयात करिअर करण्याच्या तिच्या निर्णयाला साथ दिली. राखीने बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनच्या भावाशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. -
'हम पाँच'मधल्या भूमिकेनंतर राखीला अनेक ऑफर्स आल्या होत्या.
-
मात्र खासगी आयुष्यातील समस्यांमुळे राखी तिच्या करिअरवर फारसं लक्ष केंद्रीत करू शकली नव्हती.
छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ राख विजन

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग