-
माझी या प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस सध्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत आहे. ( सर्व फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
-
अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत तिने वठविलेली जुईची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती.
-
मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
अभिनेत्री मृणाल दुसानीसचा २०१६ साली विवाह झाला. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी तिने लग्न केले.
-
लग्न झाल्यानंतर मृणालने काही काळासाठी छोट्या पडद्यापासून फारकत घेतली होती.
-
‘हे मन बावरे’ मध्ये शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस यांनी मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम केले.
-
छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या.
-
मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद वाढला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नाही तर उत्तम डान्सरही आहे.
-
पडद्यावर ठामपणे स्वत:ची भूमिका मांडण, ती व्यक्तीरेखा जगणं हे मृणास दुसानिसच्या अभिनयाचं खरं वैशिष्टय आहे.

पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, गाडी; नोव्हेंबरमध्ये शुक्राचा पॉवरफुल मालव्य राजयोग, ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु