-
करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला असून अनेक सेलिब्रेटी आपल्याला जसं शक्य आहे त्याप्रमाणे मदत करत आहेत. पण यावेळी एक बॉलिवूड सेलिब्रेटी मात्र खूप चर्चेत आहे तो म्हणजे सोनू सूद.
-
स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूद स्वत: रस्त्यावर उतरला असून मजूर आणि त्यांच्या कुटुंबासाठी बसेसची व्यवस्था करत आहे.
-
स्थलांतरित मजुरांना रस्त्यावर चालताना पाहणं आपल्यासाठी खूप कष्टदायी असल्याचं सांगत सोनू सूदने मदतीला सुरुवात केली होती.
-
एका मुलाखतीत बोलताना सोनू सूदने सांगितलं की, देशातील प्रत्येक जण चालत जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांची चिंता करत आहे. आपल्य वयस्कर आई-वडील, लहान मुलांसोबत चालणाऱ्या मजुरांना पाहून मला फार वाईट वाटलं होतं. यावेळी बंद असलेल्या बसेसचा आपण वापर करु शकतो असं माझ्या लक्षात आलं.
-
विश्वास बसणार नाही पण सोनू सूद इतक्या मोठ्या प्रमाणात मदत करत आहे की, त्याच्या ट्विटर अकाऊंटवर मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेसेज येत असून सोनू सूद त्या प्रत्येक मेसेजला उत्तर देत आहे.
-
करोनाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच सोनू सूदने आपलं जुहूमधील हॉटेल क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्याठी राज्य सरकारला देण्याची तयारी दर्शवली होती.
-
सोनू सूद महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसेसची सोय करत असून आतापर्यंत त्याने कर्नाटकमधील गुलबर्गा आणि उत्तर प्रदेशसाठी पाठवल्या आहेत. यासाठी सोनू सूदने महाराष्ट्रासहीत दोन्ही राज्यांकडून रितसर परवानगी घेतली होती.
-
सोनू सूदने सुरुवातीला कर्नाटकसाठी एकूण १० बस पाठवल्या ज्यामध्ये ३५० प्रवासी होते.
-
सोनू सूदला प्रत्येक बसमागे जवळपास ६० हजार ते दोन लाखांचा खर्च येत आहे.
-
-
बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड तसंच इतर राज्यांमध्ये रोज १० ते २० बस पाठवण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचं सोनू सूद सांगतो.
-
सोनू सूदने पंजाबमधील डॉक्टरांसाठी १५०० पीपीई किटही पाठवले आहेत.
-
इतकंच नाही तर सोनू सूदने ठाण्यातील कळवा येथे मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. सोनू सूदने मदतीसाठी ट्रक पाठवले होते.
-
सोनू सूदने रमझानमध्ये कोणी मजूर उपाशी राहू नये यासाठीही त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. सोनू सूदने आतापर्यंत एक लाखाहून जास्त लोकांच्या जेवणारची सोय केली आहे.
-
"आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. ट्रेनदेखील सुरु झाल्या आहेत. पण आपल्याला प्रवासाची परवानगी मिळेल की नाही याबाबत त्यांना शंका आहे. म्हणूनच जर ते चालत जात असतील तर किमान त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीतरी असावं यासाठी आम्ही त्यांना फळं, बिस्कीटं, वडापाव तसंच इतर गोष्टी पुरवत असल्याचं," सोनू सूदने सांगितलं आहे.
-
"अनेक लोक लॉकडाउनमध्ये आमच्याकडे काहीच काम नसल्याचं सांगत आहे. पण मला वाटतं हे तुमच्यावर अवलंबून असतं. मला वाटतं लॉकडाउनमध्ये मी सर्वात जास्त व्यस्त आहे. रोज सकाळी सात वाजता उठतो, दुपारी १२ वाजता सगळे फोन कॉल करण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी तेच सुरु असतं," असं सोनू सूद सांगतो.
-
स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी राज्यांनीही मदत केली पाहिजे. त्यांना अनेक गोष्टींची माहिती नाही. मी अनेकांच्या घरी जाण्याची व्यवस्था करत असताना त्यांना काही ठिकाणी घराबाहेर पडू दिलं जात नाही आहे असं सोनू सूदने सांगितलं आहे.
-
सोनू सूदने लोकांनाही जर कोणी मजूर रस्त्यात चालताना दिसले तर त्यांना शिजवलेलं अन्न किंवा किमान बिस्कीटचा पुडा तर द्या असं आवाहन केलं आहे.
-
सोनू सूद करत असलेल्या मदतीचं नेटिझन्सकडूनही कौतुक केलं जात असून पडद्यावर विलन साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात हिरो ठरल्याचं म्हणत आहे.
-
सोनू सूदचं कौतुक फक्त सर्वसामान्य आणि बॉलिवूडच नाही तर राजकारणी मंडळी देखील करत आहेत.
-
आपण जी मदत करत आहे त्यामागे आपली आई प्रेरणा असल्याचंही सोनू सूद सांगतो. संधी मिळाली तर मदत करावी असं आपली आई नेहमी सांगायची असं सोनू सूद म्हणतो.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या