-
सर्वसामान्यांप्रमाणे टीव्ही इंडस्ट्रीतील मोठया कलाकारांनाही लॉकडाउनचा आर्थिक फटका बसला आहे. ( सर्व फोटो सौजन्य – सौम्या टंडन इन्स्टाग्राम)
-
'भाभाजी घर पर हैं' या मालिकेत अनिता भाभीचे पात्र साकारणाऱ्या सौम्या टंडनचे पेमेंटही रखडले आहे. पण शो च्या निर्मात्यांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही तिने सांगितले.
-
मध्य प्रदेश उज्जैनमध्ये जन्मलेल्या सौम्याचे तिथल्याच कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षण झाले.
-
याआधी सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी देशव्यापी लॉकडाउनमुळे त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींविषयी सांगितले होते.
-
"आमच्या पेमेंटसना उशिर झाला आहे. माझे पेमेंटही रखडले आहे. मी मालिकेच्या निर्मात्यांवर अविश्वास दाखवणार नाही. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते पूर्ण पेमेंट नक्की करतील. पण उशिर झालाय हे मात्र नक्की".
-
"कलाकारांना सुद्धा भाडी भरावी लागतात. आई-वडिलांची देखभाल करायची असते. पेमेंटला विलंब होतोय, हे खरोखर दु:खद आहे".
-
"यामागे काय कारण आहे ते मला माहित नाही. जाहीराती नसल्यामुळे चॅनलना सुद्धा पैसा मिळत नाहीय अशी चर्चा आहे".
-
"पैसे मिळायला विलंब झाला तरी मी अजून काही दिवस राहू शकते पण दुसऱ्या कलाकारांचे तसे नाही" असे सौम्या टंडनने सांगितले.
-
तिने पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
-
लॉकडाउनमध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे कलाकारांच्या मानधनात सुद्धा कपात केली जाईल अशी अफवा पसरली आहे. त्यासंबंधी सुद्धा सौम्याला विचारण्यात आले
-
"मला सु्द्धा कमी मानधनात काम करण्यास सांगण्यात आले आहे पण अजून काहीही अंतिम ठरलेलं नाही".
-
"माझे संपूर्ण पेमेंट क्लियर होण्याची मी वाट पाहत आहे. प्रोडक्शन हाऊसकडून पुढचा मार्ग काय असेल ते सांगण्यात येईल. पुढच्या दहा दिवसात चित्र नेमके स्पष्ट होईल" असे सौम्याने सांगितले.
-
‘भाभीजी घर पर हैं’ सर्वात लोकप्रिय असलेल्या कॉमेडी शो पैकी एक आहे. यामध्ये सौम्या ‘अनिता भाभी’च्या भूमिकेत आहे.
-
सौम्याने 'डान्स इंडिया डान्स' शो चे ही सूत्रसंचालन केले आहे.
-
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात