-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी (१४ जून) मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली.
-
'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात सुशांतने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. सध्या सोशल मीडियावर धोनी व सुशांतचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
-
धोनीसोबत दिसलेला हा हसरा चेहरा आता पुन्हा कधी पाहता येणार नाही, अशी भावना चाहत्यांनी व्यक्त केली.
-
सुशांतलाही क्रिकेटची फार आवड होती. मोठं झाल्यावर क्रिकेटर होण्याचं स्वप्न त्याने अनेकदा लहानपणी कुटुंबीयांना बोलून दाखवली होती.
-
धोनीसारखा षटकार मारता यावा किंवा चित्रपटातील षटकाराचं दृश्य योग्य रितीने टिपता यावं, यासाठी सुशांतने फार मेहनत घेतली होती. यासाठी त्याने धोनीचे व्हिडीओ अनेकदा पाहिले होते.
-
चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हे दोघं एकत्र भेटले होते. त्यावेळचा हा फोटो..
-
पडद्यावर हुबेहूब धोनीला साकारण्यासाठी सुशांतने त्याच्यासोबत बराच वेळ घालवला होता
-
चित्रपटातील धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसाठी सुशांतने प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं.
-
धोनीची मुलगी झिवासोबतही सुशांतची चांगली मैत्री झाली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुशांतने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला होता.
-
या चित्रपटात धोनीच्या बालपणापासून २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला गेला आहे. या चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूतच दिग्दर्शकांची पहिली पसंत होता.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”