-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने कलाकारांसोबत अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. आता सुशांतच्या एका चाहत्यांने अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
-
एका चाहत्याने सुशांतचा फोटो मास्कवर छापून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
सध्या करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण मास्क लावत असल्याचे दिसत आहे. अशातच सुशांतच्या चाहत्याने मास्कवर सुशांतचा फोटो छापला आहे. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
या मास्कवर सुशांतच्या फोटो सोबतच एक मेसेज लिहिला आहे. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
'जिस्म से हारा हूं, रूह तो सिर्फ एक परिंदा है. धड़कनें चल रही हैं अभी मेरे भाई, तू अभी भी मेरे दिल में जिंदा है' असा संदेश मास्कवर आहे. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
चाहता हे मास्क वाटत आहेत. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
सुशांतच्या या चाहत्याचे नाव देवेंद्र बोरना आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
या चाहत्याची सध्या सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे. (Photo credit : iamdevborana/Instagram)
-
सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
-
सुशांत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘सर्व हिंदूंना अमेरिकेतून बाहेर काढा’, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे FBI चे प्रमुख, भारतीय वंशाचे काश पटेल ट्रोल