अभिनेता अर्जुन कपूरचे आता सिक्स पॅक अॅब्स आहेत. पण एकेकाळी त्याचं वजन तब्बल १४० किलो होतं. त्याला अस्थमाचाही त्रास होता. अर्जुन आता त्याच्या फिटनेसच्या बाबतीत फार जागरुक असतो. तो नियमित जिमला जातो. तिथे वेट ट्रेनिंग, कार्डिओ असे बरेच व्यायाम प्रकार करतो. सलमान खानने अर्जुनला व्यायामाचे धडे दिले असंही म्हटलं जातं. अर्जुन उत्तम खवय्या आहे. पण आता त्याने खाण्यापिण्यावर बरंच नियंत्रण मिळवलं आहे. सकाळी नाश्त्याला चार ते सहा अंडी आणि टोस्ट, दुपारी जेवणात बाजरीची भाकरी किंवा चपाती यांसोबतच भाज्या, डाळ, चिकन यांचाही त्याच्या जेवणात समावेश असतो. वर्कआऊटनंतर प्रोटीन शेक, संध्याकाळी अननस, स्ट्रॉबेरीसारखी फळं तो खातो. अर्जुनने जंक फूड आणि भूकेपेक्षा अधिक खाणं बंद केलं आहे. सुरुवातीला तो एका वेळी सहा बर्गर खाऊ शकत होता. आठवड्यातील सहा दिवस तो वर्कआऊट करतो. पहिल्याच वर्षात अर्जुनने २२ किलो वजन कमी केलं होतं. त्याने योगासनांवरही भर दिला आहे. अर्जुन कपूरने २००३ पासून कलाविश्वात कामाला सुरुवात केली. शाहरुख खानच्या 'कल हो ना हो' या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. याशिवाय 'नो एण्ट्री' आणि 'वाँटेड' या चित्रपटांसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. 'इशकजादे' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या अर्जुन अभिनेत्री मलायका अरोरा हिला डेट करत आहे.

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण