-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'सौगंध' या चित्रपटातून बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली. या पहिल्यावहिल्या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री शांति प्रियाने भूमिका साकारली होती. या चित्रपटातून त्या दोघांनी बॉलिवूडमधील प्रवासाला एकत्र सुरुवात केली होती. अक्षय कुमार सध्याच्या लोकप्रिय अभिनेता आहे. तर शांति प्रिया आता लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जाते….
-
सौगंध चित्रपटात काम करण्यापूर्वी शांति प्रियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सौगंध या चित्रपटानंतरही तिने चित्रपटांमध्ये काम केले. पण तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
‘एक्के पे एक्का’, ‘मेहेरबान’,’ फूल और अंगार’, ‘मेरे सजना साथ निभाना’, ‘अंधा इंतकाम’, ‘वीरता’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
-
त्याचप्रमाणे ‘अंजली’, ‘Naaku pellam kaaveri’ इत्यादी तमिळ, तेलुगू चित्रपटात भूमिका साकारली आहे.
-
शांतिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही काम केले आहे.
-
शांति प्रियाने 'अशी ही बनवा बनवी' चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थशी १९९२ मध्ये लग्न केले. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. पण २००४ मध्ये सिद्धार्थचे निधन झाले.
-
त्यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी शांति प्रियावर पडली. या कठिण काळात शांति प्रियाने हार न मानता ओढावलेल्या परिस्थितीवर मात केली.
-
तिने २००८मध्ये छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'माता की चौकी' या मालिकेत काम केले. ही मालिका २०११पर्यंत सुरु होती.
-
आता शांति प्रिया लवकरच बिग बॉस पर्व १४ मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जाते.

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय