-
भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गंभीर सायबर हल्ल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंटने 10 सिनेमे आणि 10 वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. हे सिनेमे किंवा वेब सीरिज फ्री वेबसाइटवर बघताना सायबर हल्ला होऊ शकतो असा इशारा डिपार्टमेंटकडून देण्यात आला आहे. फ्री वेबसाइट्सवर हे सिनेमे किंवा वेब सीरिज बघताना आपोआप एक मॅलवेअर डाउनलोड होऊन, त्याद्वारे कॉम्प्युटर किंवा मोबाइलमधील माहिती हॅक केली जाऊ शकते असे सांगण्यात आले आहे. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाइटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे. जाणून घेऊया कोणते आहेत ते सिनेमे आणि वेब सीरिज :-
-
जवानी दिवानी (Jawani Diwani)
-
मर्दानी-2 (Mardani 2)
-
झूटोपिया (Zootopia)
-
छपाक (Chhapaak)
-
लव आज-कल (Love Aaj Kal)
-
इन्सेप्शन (Inception)
-
बाहुबली (Baahubali)
-
रजनीगंधा (Rajnigandha)
-
गली बॉय (Gully Boy)
-
बाला (Bala)
-
दिल्ली क्राइम (Delhi Crime)
-
ब्रूकलिन नाइन-नाइन (Brooklyn Nine-Nine)
-
पंचायत (Panchayat)
-
अकूरी (Akoori)
-
देवलोक (Devlok)
-
घौल (Ghoul)
-
लॉस्ट (Lost)
-
माइंडहंटर (Mindhunter)
-
नार्कोस (Narcos)
-
फौदा (Fauda)

देवी कालरात्री कोणत्या रूपात १२ राशींना देणार आशीर्वाद? कोणाची संकट दूर पळून जाणार? वाचा राशिभविष्य