भारती सिंग ही देशातल्या यशस्वी महिला कॉमेडियन्सपैकी एक मानली जाते. कॉमेडी शो, विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन अशा बऱ्याच कामांचे ऑफर्स तिला येतात. भारतीची अफलातून विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा प्रेक्षकांना फार आवडतो. तिच्या कॉमेडीमुळे भारतीचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'रिपब्लिक वर्ल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीने सात कोटींची कमाई केली आहे. -
-
एका शोसाठी ती सात ते आठ लाख रुपये मानधन घेते.
पुरस्कार सोहळ्यांत किंवा रिअॅलिटी शोमध्ये थोड्या वेळाकरिता कॉमेडी करण्यासाठीही तिला तगडं मानधन दिलं जातं. भारतीकडे दोन पॉश कार आहेत. Audi Q5 आणि Mercedes-Benz GL 350 या दोन महागड्या गाड्या तिने विकत घेतल्या आहेत. याशिवाय भारतीचं मुंबईत स्वत:चं घर आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी भारतीने हर्ष लिंबाचियाशी लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला होता.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली