-
सध्या बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली होती. व्हर्जिन भानुप्रिया या चित्रपटामुळे तिच्या नावाची चर्चा सुरू होती. (सर्व फोटो : योगेन शाहा इन्स्टाग्राम, उर्वशी रौतेला फॅन पेज)
-
व्हर्जिन भानुप्रिया या चित्रपटाचा ट्रेलरही रिलिज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गौतम गुलाटीदेखील असणार आहे. परंतु यादरम्यान पुन्हा एकदा उर्वशी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचं कारणही तसंच आगळंवेगळं आहे.
-
उर्वशी सध्या चर्चेत आलीये ते म्हणजे तिच्या कपड्यांमुळे. ती मुंबईतील ओशिवरा परिसरात काही अशा अंदाजात स्पॉट झाली.
-
उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर झाले होते आणि काही क्षणताच मोठ्या प्रमाणात व्हायरलंही झाले.
-
तिच्या या कपड्यांवरून अनेकांनी तिची फिरकीही घेतली. तर काही जणांनी तिनं हे नक्की काय परिधान केलंय असा सवालही केला.
-
यापूर्वी अनेकदा तिच्या कपड्यांवरून, ड्रेसिंग सेन्सवरून तिच्या चाहत्यांनी तिचं स्तुतीही केली होती.
-
परंतु तिच्या या कपड्यांवरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे.
-
उर्वशी ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रावरही अनेक फॉलोअर्स आहेत.
-
काही दिवसांपूर्वी ती मालदीवमध्ये फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी बिचवरील काही फोटोंवरूनही युझर्सनं तिला ट्रोल केलं होतं.
-
मध्यंतरी ती जॉन अब्राहमसोबत पागलपंती या चित्रटातही झळकली होती.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय