-
महाराष्ट्रातल्या समस्त महिला आणि मुलींसाठ नथ हा एक विक-पॉईंट असतो. भलेही मुलींना नट्टा-फट्टा करायची आवड नसेल तरीही एकदातरी नथ घालून मिरवावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. सिनेमातील अभिनेत्रीही याला काही अपवाद नाहीत.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपले नथ घातलेले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (फोटो सौजन्य – सोनाली कुलकर्णी फेसबूक अकाऊंट)
-
काही दिवसांपूर्वी सोनालीने हिरकणी या सिनेमात काम केलं होतं, यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओकने तिला पारंपरिक पद्धतीने नाक टोचून घ्यायला लावलं होतं.
-
काही गोष्टी या जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनेच कराव्या लागतात असं आजी आणि प्रसाद ओक म्हणतात अशी गमतीशीर कॅप्शन सोनालीने आपल्या फेसबूक व्हिडीओला दिली आहे.
-
एकदा नथ घातली की मग पुढे मिरवायला सज्ज…
-
गेल्या काही वर्षांत या नथीचे अनेक प्रकार बाजारात आले, पण पारंपरिक नथीत कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून येतं.
-
नथीच्या नखऱ्यात सोनालीही अधिक खुलून दिसतेय…

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल