छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व तितकाच चर्चेत राहिलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस'ने अनेकांना प्रसिद्धी मिळवून दिली. बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आलेल्यांपैकी एक नाव म्हणजे शहनाज गिल. 'बिग बॉस १३'मध्ये शहनाज स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमुळे तिचं नशीब रातोरात पालटलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर शहनाजला अनेक मॉडेलिंग व म्युझिक अल्बमचे ऑफर्स येऊ लागले. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत तुफान वाढ झाली असून आता ती एका पोस्टसाठी तगडं मानधन घेते. शहनाजच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंना चाहत्यांकडून भरभरून लाइक्स मिळतात. एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी शहनाज दहा लाख रुपये घेत असल्याचं समजतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत फार वाढ झाली आहे. याचाच फायदा घेत तिने इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेणारं मानधन वाढवलंय. बिग बॉसच्या घरात शहनाज व सिद्धार्थ शुक्ला यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. -
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शहनाज ही असिम रियाजला डेट करत असल्याची चर्चा आहे. असिमसुद्धा बिग बॉसचा स्पर्धक होता.
सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम, शहनाज गिल

मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही…, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलताईंचे स्पष्टीकरण